© karpenko_ilia - stock.adobe.com | Vector line concept foreign language school

वाक्प्रयोग पुस्तक

तुमच्या झोपेमध्ये शिकणे

© karpenko_ilia - stock.adobe.com | Vector line concept foreign language school
ar AR de DE em EM en EN es ES fr FR it IT ja JA pt PT px PX zh ZH af AF be BE bg BG bn BN bs BS ca CA cs CS el EL eo EO et ET fa FA fi FI he HE hr HR hu HU id ID ka KA kk KK kn KN ko KO lt LT lv LV mr MR nl NL nn NN pa PA pl PL ro RO ru RU sk SK sq SQ sr SR sv SV tr TR uk UK vi VI

तुमच्या झोपेमध्ये शिकणे

सध्या, परकीय भाषा या रोजच्या शिक्षणाचा भाग बनल्या आहेत. फक्त त्यांना शिकत असल्यास रटाळपणा येणार नाही! ज्यांना त्या भाषांबरोबर शिकण्यात अडथळे वाटत आहेत त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे. आपण झोपेत अधिक चांगल्या रीतीने शिकू शकतो. वेगवेगळे वैज्ञानिक अभ्यास आणि संशोधन या निष्कर्ष पर्यंत पोहोचले आहेत. आणि जेव्हा भाषा शिकण्याची वेळ येते तेव्हा आपण हे वापरू शकतो. आपण दिवसातील घटनांवर झोपेत प्रक्रिया करतो. आपला मेंदू नवीन अनुभवाबाबत छाननी करत असतो. जे काही आपण अनुभवतो, त्यावर पुन्हा एकदा विचार होतो आणि नवीन आशय आपल्या मेंदूत टाकला जातो. झोपण्या अगोदर शिकलेल्या अथवा अनुभवलेल्या गोष्टी विशेषतः अगदी चांगल्या रीतीने लक्षात राहतात. म्हणून, महत्वाच्या गोष्टींची संध्याकाळी उजळणी केली तर ते आधी चांगलेच लक्षात राहते. वेगवेगळ्या झोपेच्या अवस्था वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यास कारणीभूत असतात. REM झोप मानसोपचार गोष्टी शिकण्यास मदत करतात. गाणे किंवा खेळणे या प्रकारात मोडतात. याच्या उलट अस्सल ज्ञान हे तीव्र झोपेत शिकले जाते. इथेच आपण जे काही शिकलो त्याची उजळणी होते. शब्दसंग्रह आणि व्याकरण सुद्धा! जेव्हा आपण एखादी नवीन भाषा शिकतो, तेव्हा आपल्या मेंदूने कष्ट घेतले पाहिजे. त्याने नवीन शब्द आणि नियम लक्षात ठेवले पाहिजे. झोपेत देखील याची एकदा उजळणी झाली पाहिजे. संशोधक यास रिप्ले/पुनर्बिंबण तत्व असे म्हणतात परंतु, तुम्ही चांगले झोपणे महत्वाचे आहे. शरीर आणि मन यांमध्ये पुनर्योजन व्यवस्थितपणे होणे महत्वाचे आहे. त्यानंतरच, मेंदू अधिक कार्यक्षमतेने कार्य करू शकेल. तुम्ही म्हणू शकता: छान झोप, चांगली मानसिक कार्यक्षमता. जेव्हा आपण विश्रांती घेतो, तेव्हा देखील आपला मेंदू कार्य करत असतो. म्हणून: शुभरात्री, शुभरात्री, शुभरात्री, शुभरात्री !