वाक्प्रयोग पुस्तक

वर्णमाला

ar AR de DE em EM en EN es ES fr FR it IT ja JA pt PT px PX zh ZH af AF be BE bg BG bn BN bs BS ca CA cs CS el EL eo EO et ET fa FA fi FI he HE hr HR hu HU id ID ka KA kk KK kn KN ko KO lt LT lv LV mr MR nl NL nn NN pa PA pl PL ro RO ru RU sk SK sq SQ sr SR sv SV tr TR uk UK vi VI

वर्णमाला

आपण भाषांद्वारे संवाद साधू शकतो. आपण काय विचार करतो आणि आपल्या भावनांबद्दल आपण इतरांना सांगतो. लेखनामध्ये देखील हे कार्य आहे. बहुतांश भाषांकरीता लेखनासाठी लिपी आहे. जे आपण लिहितो त्यात अक्षरे असतात. ही अक्षरे/वर्ण वैविध्यपूर्ण असू शकतात. लेखन हे सर्वाधिक अक्षरांपासूनच बनलेले असते. या अक्षरांमुळे वर्णमाला तयार होते. एक वर्णमाला म्हणजे चित्रलेखीय चिन्हांचा संच आहे. हे वर्ण शब्द स्वरूपामध्ये जोडण्यासाठी विशिष्ट नियम आहेत. प्रत्येक अक्षराचे ठरलेले उच्चारण आहे. "वर्णमाला" हे पद ग्रीक भाषेमधून येते. तिथे, पहिल्या दोन अक्षरांना "अल्फा" आणि "बीटा" म्हटले जाते. संपूर्ण इतिहासामध्ये अनेक प्रकारच्या वर्णमाला आहेत. लोक जास्तीतजास्त 3,000 वर्षांपूर्वीपासून वर्ण वापरत होते. तत्पूर्वी, वर्ण म्हणजे जादुई चिन्हे होती. केवळ काही लोकांनाच फक्त त्याचा अर्थ माहीत असे. नंतर, वर्णांनी त्यांचे चिन्हात्मक स्वरूप गमावले. आज, अक्षरांना काहीच अर्थ नाही आहे. त्यांना तेव्हाच अर्थ प्राप्त होतो जेव्हा ते इतर अक्षरांशी जोडले जातात. चायनीज भाषेतील वर्ण वेगळ्या पद्धतीने कार्य करतात. ते चित्रासारखे असायचे आणि त्यांचा अर्थ चित्रांतूनच वर्णन केला जात असे. जेव्हा आपण लिहितो तेव्हा आपण आपले विचार लिपीबद्ध करतो. एखाद्या विषयाचे ज्ञान नोंदवण्यासाठी आपण वर्ण वापरतो. वर्णमालेचे लिपीतून मजकुरात रुपांतर करण्यास आपला मेंदू शिकला आहे. वर्ण शब्द होतात, शब्द कल्पना होतात. या प्रकारे, एक मजकूर हजारो वर्षे टिकून राहू शकतो. आणि तरीही समजू शकतो.