वाक्प्रयोग पुस्तक
लहान मुले ओठ-वाचक असतात.
लहान मुले ओठ-वाचक असतात.
जेव्हा लहान मुले बोलायला शिकत असतात, तेव्हा ते त्यांच्या पालकांच्या तोंडाकडे लक्ष देत असतात.
विकासात्मक मानसशास्त्रज्ञांनी हे शोधून काढले आहे.
लहान मुले वयाच्या सुमारे सहा महिन्यांपासूनच ओठांच्या हालचालींचे निरीक्षण करण्यास सुरूवात करतात.
अशा पद्धतीने शब्द निर्माण करण्यासाठी आपल्या तोंडाची हालचाल कशी करावी हेशिकतात.
लहान मुले एक वर्षाची होतात तेव्हा ते आधीच काही शब्द समजू शकतात.
या वयानंतरच ते पुन्हा लोकांच्या डोळ्यांत पाहणे सुरू करतात.
असे करण्याने त्यांना भरपूर महत्वाची माहिती मिळते.
त्यांच्या डोळ्यांमध्ये पाहून ते त्यांचे पालक आनंदी किंवा दु:खी आहेत हे सांगू शकतात.
अशा पद्धतीने ते भावनेचे जग ओळखायला शिकतात.
कोणीतरी त्यांना परदेशी भाषेत बोलते तेव्हा ते मनोरंजक वाटते.
मग मुले पुन्हा ओठ वाचण्यासाठी सुरूवात करतात.
अशा प्रकारे ते परदेशी उच्चार सुद्धा कसे बनवायचे ते शिकतात.
म्हणून जेव्हा तुम्ही लहान मुलांशी बोलाल तेव्हा, तुम्ही त्यांच्याकडे पाहणे आवश्यक आहे.
यापेक्षाही असे कि, लहान मुलांशी त्यांच्या भाषा विकासासाठी संभाषण करणे आवश्यक आहे.
विशेषतः, पालक अनेकदा मुले काय म्हणतात त्याची पुनरावृत्ती करतात.
त्यामुळे मुलांना प्रतिसाद मिळतो.
बालकांसाठी ते अतिशय महत्त्वाचे आहे.
मग त्यांना माहित होते कि ते समजले आहेत.
हे पुष्टीकरण बालकांना प्रोत्साहित करते.
ते बोलायला शिकण्यामधील मजा कायम घेतात.
त्यामुळे नवजात मुलांसाठी ध्वनिफिती वाजविणे पुरेसे नाही.
अध्ययनाने हे सिद्ध केले आहे कि, लहान मुले खरोखर ओठ वाचण्यात सक्षम असतात.
प्रयोगामध्ये, बालकांना आवाज नसलेल्या चित्रफिती दर्शविल्या गेल्या होत्या.
त्या स्थानिक आणि परकीय भाषांच्या चित्रफिती होत्या.
स्व:ताच्या भाषेतील चित्रफितीकडे मुले जास्त काळ पाहत होती.
हे करण्यामध्ये ती अधिक लक्ष देत होती.
पण लहान मुलांचे पहिले शब्द जगभरात समान आहेत.
"मम" आणि "डाड" म्हणणे सर्व भाषांमध्ये सोपे आहे.