वाक्प्रयोग पुस्तक

mr रंग   »   te రంగులు

१४ [चौदा]

रंग

रंग

14 [పద్నాలుగు]

14 [Padnālugu]

రంగులు

Raṅgulu

तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:   

महिला आणि पुरुष वेगळ्या पद्धतीने बोलतात

आपल्या सर्वांना माहितच आहे कि महिला आणि पुरुष वेगळे आहेत. पण तुम्हांला हे सुद्धा माहित आहे का की, ते वेगळ्या पद्धतीने बोलतात? विविध अभ्यास हे दाखवतात. महिला पुरुषांपेक्षा वेगळी भाषण शैली वापरतात. त्या बर्‍याचदा त्या कसं बोलतात यामध्ये खूप अप्रत्यक्ष आणि भिडस्त असतात. विरोधाने, पुरुष साधारणतः स्पष्ट आणि प्रत्यक्ष भाषा वापरतात. पण ते ज्या विषयाबद्दल बोलतात ते सुद्धा वेगळे असतात. पुरुष बातम्या, अर्थशास्त्र किंवा क्रीडा यांबद्दल अधिक बोलतात. महिला सामाजिक विषयांना महत्व देतात जसे की, कुटुंब किंवा आरोग्य. म्हणजेच, पुरुषांना वस्तुस्थितीबद्दल बोलायला आवडते. महिला लोकांबद्दल बोलायला प्राधान्य देतात. हे लक्षवेधक आहे की, महिला कमकुवत भाषा वापरण्याचा प्रयत्न करतात. म्हणजेच, त्या अधिक काळजीपूर्वक आणि नम्रपणे बोलतात. महिलासुद्धा बरेच प्रश्न विचारतात. असं करण्यामध्ये, त्यांना बर्‍याचदा ऐक्य मिळवायचं असतं आणि कलह टाळायचा असतो. शिवाय, महिलांकडे भावनांसाठी खूप मोठा शब्दसंग्रह असतो. पुरुषांसाठी, संभाषण हे बर्‍याचदा स्पर्धेचा एक भाग असतो. त्यांची भाषा ही स्पष्टपणे अधिक प्रक्षोभक आणि आक्रमक असते. आणि पुरुष प्रत्येक दिवशी महिलांपेक्षा अगदीच कमी शब्द बोलतात. काही संशोधक दावा करतात की, हे मेंदूच्या रचनेमुळे होते. कारण महिला आणि पुरुषांमध्ये मेंदू वेगळा असतो. असे सांगितले आहे की, त्यांच्या भाषण केंद्रांची रचनासुद्धा वेगळी असते. जरी बरेच दुसरे घटक आपल्या भाषेवर चांगलाच प्रभाव टाकतात. विज्ञानाने बर्‍याच कालावधीसाठी या भागाचा शोध लावला नाही. तरीपण, महिला आणि पुरुष पूर्णपणे वेगळी भाषा बोलत नाहीत. गैरसमज व्हायला नको. यशस्वी संभाषणासाठी अनेक कृतीयोजना आहेत. सर्वांत सोप्प आहे: चांगलं ऐका!