С-кем-Вы в-----и-и-ь?
С к__ В_ в___________
С к-м В- в-т-е-и-и-ь-
---------------------
С кем Вы встретились? 0 Ka-o------tuk-------il?K____ g______ t_ n_____K-k-y g-l-t-k t- n-s-l------------------------Kakoy galstuk ty nosil?
दोन भाषा बोलणार्या लोकांना चांगले ऐकू येते.
ते अधिक अचूकपणे विविध आवाजातील फरक ओळखू शकतात.
एक अमेरिकेचे संशोधन या निष्कर्षाप्रत पोहोचले आहे.
संशोधकांनी अनेक तरुणांची चाचणी घेतली.
चाचणीचा काही भाग हा द्विभाषिक होता.
हे तरुण इंग्रजी आणि स्पॅनिश बोलत होते.
इतर तरुण फक्त इंग्रजीच बोलत होते.
तरुण लोकांना विशिष्ट शब्दावयव (अक्षर) ऐकवायचे होते.
ते अक्षर दा होते.
ते अक्षर अथवा शब्द दोन्हीही भाषेशी संबंधित नव्हता.
हेडफोनचा वापर करून शब्द किंवा अक्षर ऐकविण्यात आले.
त्याचवेळी त्यांच्या मेंदूचे कार्य इलेक्ट्रोडने मोजले गेले.
या चाचणी नंतर त्या युवकांना ते शब्द पुन्हा ऐकविण्यात आले.
यावेळी त्यांना अनेक विदारी आवाज देखील ऐकू आले.
त्याच वेळी विविध आवाज देखील अर्थहीन वाक्ये बोलत होती.
द्विभाषिक लोकांनी या शब्दांप्रती जोरदार प्रतिक्रिया व्यक्त केली.
त्यांच्या मेंदूने अनेक क्रिया दर्शविल्या.
मेंदू विदारी आवाज असताना आणि नसताना देखील शब्द अचूक ओळखत होता.
एकभाषी लोक यामध्ये यशस्वी झाले नाहीत.
त्यांचे ऐकणे द्विभाषी लोकांएवढे चांगले नव्हते.
या प्रयोगाच्या निकालाने संशोधक आश्चर्यचकित झाले.
तोपर्यंत फक्त संगीतकारच चांगले ऐकू शकतात असे प्रचलित होते.
परंतु असे दिसते की द्विभाषीकांनी देखील त्यांच्या कानांना प्रशिक्षण दिले आहे.
जे लोक द्विभाषीक आहेत ते सतत विविध आवाजांशी मुकाबला करत असतात.
म्हणून, त्याच्या मेंदूने नवीन क्षमता विकसित करणे गरजेचे आहे.
त्यामुळे त्यांचा मेंदू वेगवेगळ्या भाषांमध्ये फरक कसे करावे हे शिकतो.
संशोधक आता भाषा कौशल्ये ही मेंदूवर कशी परिणाम करतात याची चाचणी घेत आहेत.
जेव्हा एखादी व्यक्ती नंतरच्या आयुष्यात भाषा शिकेल तेव्हा कदाचित ऐकणे त्यास लाभदायक ठरेल...